Corruption in the jalyukt Shivar Yojana  
विदर्भ

अहो आश्चर्यम...माहिती द्या; नाहीतर तीन लाख खंडणी द्या!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांच्या अभिलेखांचे अवलोकन करण्यासाठी एकूण पाच प्रकारचे अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यास माहिती न मिळाल्यामुळे खासगी स्थापत्य अभियंता संजय सुरवाडे यांनी माहिता द्या, अन्यथा तीन लाख रुपये खंडणी द्या, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात माहिती न मिळाल्याने खासगी अभियंता संजय सुरवाडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे.

जिल्हा परिषदेत जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांत सर्वात जास्त अपहार व अनियमितता झाली आहे. लघुसिंचन विभाग माहितीच्या अधिकारात माहिती मागुन सुद्धा माहिती उपलब्ध करून देत नाही. प्रथम अपिल करून सुद्धा अपिलावर सुनावणी घेण्यात येत नाही. सुनावणी झालीच तर ठरल्याप्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यात येत नाही. 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केल्यामुळे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केल्यानंतर सुद्धा माहिती मिळत नसल्याचा आरोप सुरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा - कॉँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी
कामात अनियमिततेचा आरोप
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सर्व कामांचे सर्वेक्षण न करणे, चुकीची अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता न घेणे, एकाच कामाचे दोन वेळा देयक काढणे, बांधकामामध्ये दगडाच्या चुरीचा वापर करणे, मान्यता नसताना कार्यारंभ आदेश देणे, आवश्यक असलेल्या दस्तऐवजांचा अभिलेख न करताच देयक मंजूर करणे, वाळूच्या स्वामित्व धनाच्या पावत्या देणे, कमी काम करणे परंतु जास्त मोजमापे लिहून देयके काढणे, यासारख्या अनेक अनियमितता झाल्याचा आरोप सुरवाडे यांनी केला आहे.

गुन्हे ही दाखल करा!
जलयुक्त शिवार अभियानाची माहिती मिळत नसल्याने 3 लाख रुपये खंडणी द्यावी, अशी मागणी सुरवाडे यांनी केली आहे. त्याबदल्यात पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल करावे, असा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे. त्यानंतर सुद्धा माहिती मिळत नसल्याची ओरड त्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Pune News: पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे; हवेत विष कालविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई!

Palghar News: जलमार्गाने प्रवास सुखकर! 'जलसार ते मारंबळपाडा'दरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार

Sangrampur News: संग्रामपुरात आदिवासींची होळी; भोंगर्‍या बाजाराने रंगला सातपुडा, होळीची काय आहे लोककथा?

SCROLL FOR NEXT